Latest News: To Download AIFF 'D' Licence Course Form - Click Here

नागपूरला फुटबॉलचे अँस्ट्रोटर्फ

नागपूरला फुटबॉलचे अँस्ट्रोटर्फ

‘नागपूर महानगरपालिकेने यशवंत स्टेडियम केवळ फुटबॉलसाठी सर्मपित केल्यास येत्या
वर्षभरात नागपूरला आर्टिफिशियल अँस्ट्रोटर्फ देण्याची आपली तयारी

आहे. याशिवाय या मैदानावर विद्युत प्रकाश झोतात खेळण्याची संपूर्ण व्यवस्थादेखील उपलब्ध होऊ शकेल,’’ अशी ग्वाही अ. भा. फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आज येथे दिली.

ना. पटेल हे लोकमततर्फे आयोजित नागपूर प्रीमिअर लीग (एनपीएल) फुटबॉल स्पर्धेच्या दुसर्याा पर्वाच्या समारोप समारंभात मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. रविवारी प्रेक्षकांनी खच्चून भरलेल्या यशवंत स्टेडियममध्ये आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी भारतीय लीग समितीचे अध्यक्ष आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल, टॉपवर्थ उद्योग समूहाचे अध्यक्ष अभय लोढा, मॉनेट इस्पात अँण्ड एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक संदीप जाजोदिया, व्हिडिओकॉन लिमिटेडचे संचालक अनिरुद्ध धूत, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानवृत्त न्या. व्ही. एस. सिरपूरकर, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अँड. शशांक मनोहर, राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नितीन राऊत, अभिजित ग्रुपचे चेअरमन मनोज जयस्वाल, सर्व फ्रॅन्चायसीचे प्रमुख, एनडीएफएचे अध्यक्ष अटलबहादूरसिंग, उपाध्यक्ष हरेश व्होरा व्यासपीठावर उपस्थित होते.

ना. पटेल म्हणाले,‘‘नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या नावावर स्वत:चे मैदान नसल्यामुळे आम्ही महाराष्ट्रातच कोल्हापूरला अँस्ट्रोटर्फ उपलब्ध करून दिले. यशवंत स्टेडियम फुटबॉलला सर्मपित करण्याची मनपाची तयारी असेल तर अँस्ट्रोटर्फ आणि लाईटची व्यवस्था मी करतो. वर्षभरात हे काम पूर्ण होईल, याची ग्वाही देतो.’’ खा. विजय दर्डा यांनी आपल्या प्रास्ताविकात नागपूरला आय लीगचे (इंडियन फुटबॉल लीगचे) यजमानपद मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली होती. हाच धागा पकडून ना. पटेल म्हणाले, ‘‘यशवंत स्टेडियमवर पुरेशा सुधारणा झाल्यास याच वर्षी आय लीगचे आयोजन नागपूरला मिळेल, हा माझा शब्द आहे.’’एनपीएलसारखी स्पर्धा देशात होत नाही, या शब्दांत एनपीएल आयोजनाचा गौरव करीत त्यांनी लोकमत आणि खा. विजय दर्डा यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले,‘‘लोकमतने फुटबॉलला नवे वैभव मिळवून देण्याचा संकल्प सोडला आहे. औरंगाबाद आणि कोल्हापूरसह आता राज्याच्या अनेक भागांत लोकमत असे आयोजन करीत आहे. नागपूरसारख्या तुलनेने लहान शहरात फुटबॉलसाठी येथील उद्योगपती आणि व्यावसायिकांनी जी उदारता दाखविली ती खरोखरच कौतुकास्पद आहे.’’

एनडीएफएचे अध्यक्ष अटलबहादूरसिंग यांनी लोकमत आणि ना. प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने फुटबॉलला चांगले दिवस येत असल्याबद्दल लोकमतप्रति ‘थ्री चीअर्स’ केले. एनडीएफएच्यावतीने त्यांनी ना. पटेल आणि खा. विजय दर्डा यांचा सत्कार केला. लोकमत मीडिया लिमिटेडचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी प्रास्ताविकात लोकमत एनपीएलच्या आयोजनाद्वारे भारतीय फुटबॉलला उच्च स्थानावर नेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. ते म्हणाले,‘‘जोवर युवा खेळाडूंना मैदान मिळणार नाही तोवर खेळाची प्रगती होणे शक्य नाही. त्यासाठीच यशवंत स्टेडियम मनपाने फुटबॉलला सर्मपित करावे. या मैदानावर सुविधा निर्माण झाल्यास युवा फुटबॉलपटूंच्या प्रगतीची दारे मोकळी होतील. याशिवाय नागपूरला आय लीगचेही आयोजन मिळाल्यास स्थानिक फुटबॉल प्रतिभेला प्रेरणा मिळेल.’

एनपीएलसारखे आयोजन देशभर व्हावे- जिंदल
‘‘एनपीएलसारखे आयोजन प्रत्येक मोठय़ा शहरात व्हायला हवे. एनपीएल दिवसेंदिवस लोकप्रिय होत राहील. देशभर असे आयोजन झाल्यास क्रिकेटच्या तुलनेत मागे असलेला हा खेळ भारतात
अव्वल स्थानावर येण्यास वेळ लागणार नाही.’’
सज्जन जिंदल,
आय लीग समितीचे अध्यक्ष

source: lokmat.com

Share this!

Subscribe to our RSS feed. Tweet this! StumbleUpon Reddit Digg This! Bookmark on Delicious Share on Facebook